• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

बांबुके बोंबिल

साहित्य – ५ ते ६ बांबुके बोंबिल ( बांबू वरती ओले बोंबील फक्त एक उन देवून सुकवलेले असतात. ) ४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ मोठा चमचा आले लसणाचा ठेचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, एक चमचा हळद, २ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, चवीनुसार मीठ आणि ४ चमचे तेल.

कृती – प्रथम एका प्यान मध्ये गरम तेलात आले लसणाचा ठेचा लालसर परतून घ्या आणि त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, एक चमचा हळद, २ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला टाकून हा देखील परतून घ्या. मसाला परतून झाल्यावर त्यात बांबुके बोंबिल टाका आणि मसाल्यात चांगले घोळून घ्या. आता यात वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व मिश्रण एकजीव करा. सर्व मिश्रण एकजीव झाल्यावर वर झाकण ठेवून बोंबील दोन्ही बाजूने चांगले शिजवून घ्या. तयार आहे कोळीवाड्यातले प्रसिध्द बांबुके बोंबिल.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *