• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

सुक्या कर्दिचा तेल कांदा

साहित्य – एक मोठी वाटी सुकी कर्दि, बारीक चिरलेला कांदा २ वाटी, एक मध्यम काप केलेले टोमॅटों, ४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ मध्यम कप केलेले बटाटे, बारीक चिरलेली कोथिम्बिर एक वाटी, एक चमचा हळद, ३ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, चवीनुसार मीठ आणि ४ मोठे चमचे तेल.

कृती – प्रथम कर्दीचा डोक्याकढील आणि शेपटीकढील भाग वेगळा करावा. अशाच प्रकारे सर्व कर्दींना साफ करून घ्यावे. साफ केलेली कर्दि १५ मिनिटे कोमट पाण्यात भिजवून ठेवावी. आता एका प्यानमध्ये ४ चमचे तेल गरम करून घ्यावे आणि त्यात मिरची आणि कांदा लालसर करून घ्यावा. कांदा लालसर झाल्यावर त्यात बटाटे, टोमॅटों, कर्दि, एक चमचा हळद, ३ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व मिश्रण एकजीव करून वर झाकण ठेवावे आणि वाफेवर १० ते १५ मिनिटे शिजवावे. शिजत असताना मध्ये मध्ये सर्व जिन्नस परतून घ्यावे ( कर्दिचे चे मिश्रण एकदमच ड्राय झाले असेल तर आपण अर्धी वाटी पाण्याचा वापर करू शकता. त्या पेक्षा जास्त पाणी वापरू नये ) १५ मिनिटांनी त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून पुन्हा कर्दि ५ मिनिटे शिजवून घ्यावी. ५ मिनिटांनी ग्यास बंद करावा आणि तयार कर्दीचा तेल कांदा गरमागरम भाकरी सोबत सर्व्ह करावा.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *