भरलेल्या माकल्यांचे आंबट – Stuffed Squid Gravy
साहित्य – ४०० ग्रॅम छोट्या माकल्या, एक वाटी कोथिंबीर , ३ tbl spn चण्याच्या डाळ्या, ४ tbl spn ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, १ tbl spn हळद, २ इंच आले, अर्धी वाटी ओले खोबरे, १५ लसूण पाकळ्या, अर्धी वाटी सुके खोबरे, अर्धी वाटी चिंचेचा कोळ, चवीनुसार मीठ.
या रेसीपीसाठी माकल्या साधारण या आकारात घ्याव्यात.
कृती – सर्वप्रथम एका पॅनमध्ये २ चमचे तेल घ्यावे, आता यात ३ चमचे ओले खोबरे, ३ चमचे सुखे खोबरे, चण्याच्या डाळ्या, ५ लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आले टाकून खरपूस परतून घ्यावे. मिश्रण परतून झाल्यावर त्यात अर्धा चमचा हळद आणि एक चमचा ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला टाकावा. सर्व मिश्रण चांगले परतून घ्यावे. मिश्रण परतून झाल्यावर यात थोडी कोथिंबीर आणि अर्धा चमचा किंव्हा तुमच्या चवीनुसार मीठ टाकावे आणि कोथिंबीर मऊसर होई पर्यंत परतून घ्यावे. मिश्रण थंड करून एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यावे. साधारण या मिश्रणात दीड चमचा चिंचेचा कोळ टाकावा आणि मिश्रण जाडसर अगदी कमी पाण्याचा वापर करून वाटून घ्यावे. माकल्या भरताना त्याचा मागील भाग अगोदर उघडून घ्यावा. आता या मागील भागात आपले तयार वाटण भरून घ्यावे. अशाच तर्हेने बाकीच्या माकल्या देखील भरून घ्यायच्या आहेत. आता माकल्यांच्या आंबटासाठी लागणारे वाटण तयार करावे. यासाठी ५ – ६ लसूण पाकळ्या, दिड इंचाचे आले, अर्धी वाटी कोथिंबीर आणि भाजलेले सुके खोबरे घ्या. या सर्वांच पात्तळ आणि बारीक वाटण तयार करून घ्या. आता पॅनमध्ये ३ tbl spn तेल टाकून चांगले गरम करून घ्या आता यात आंबटासाठी लागणारे वाटण टाकून चांगले परतून घ्या. यात १/२ tbl spn हळद आणि ३ tbl spn ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला टाकावा. वाटण चांगले तेलात भाजून घ्या. वाटण तेलात भाजून झाल्यावर यात एक एक करून भरलेल्या माकल्या सोडा. जर तुमचे भरायच्या सारणाचे वाटण उरले असेल तर ते ही यात टाकू शकता. यात ४ वाटी कोमट पाणी टाकावे . सर्व वाटण पाण्यात हलक्या हाताने घोळून घ्यावे. आता या आंबटाला वर झाकण ठेवून १० मिनिटे वाफेवर शिजू द्यावे. १० मिनिटानंतर झाकण उघडावे. यातील माकल्या हलक्या हाताने परतून घ्याव्यात जेणेकरून त्या दोन्ही बाजूने व्यवस्थित शिजून येतील. नंतर यात ३ tbl spn चिंचेचा कोळ टाकावा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी. चवीनुसार मीठ टाकावे. आपण सारणामध्ये सुद्धा मीठ टाकले होते म्हणून जपून मीठ टाकावे आणि मिश्रण चांगले घोळून घ्यावे. आता वर पुन्हा झाकण ठेवून १५ मिनिटे वाफेवर शिजवून घ्या. १५ मिनिटांनंतर गॅस बंद करा. भरलेल्या माकल्यांचे आंबट तय्यार !
There are no comments