• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

‘बोयरी’ चे आंबट

साहित्य – ३ ते ५ बोयरी (बोय) मासळी, ८ ते ९ लसुन, दीड इंच आले, ४ हिरव्या मिरची आणि अर्धी वाटी कोथिंबीर, ५ ते ६ कोकम, ३ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, हळद, चवीनुसार मीठ, अर्धी वाटी भाजलेलं सुखं खोबरं, ४ मोठे चमचे तेल.

कृती – अर्धी वाटी भाजलेलं सुखं खोबरं घ्या आणि सोबत आले, लसुन, मिरची आणि कोथिंबीर या सर्वांचं बारीक वाटण तयार करून घ्या. नंतर आपल्या बोय मासळीचे मध्यम आकारांचे तुकडे करून घ्या आणि स्वच्छ धुवून घ्या. आता एका पातेल्यात ४ चमचे तेल गरम करून चांगले तापवून घ्या. नंतर गरम तेलात तयार झालेलं वाटण या तेलात चांगलं परतून घ्या. वाटण परतून झाल्यावर एक छोटा चमचा हळद आणि ३ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला टाकायचा व तो चांगला मसाल्यात परतून घ्यावा. आता जो पर्यंत आपल्या मिश्रणातून तेल बाजूला होत नाही तो पर्यंत सर्व मिश्रण सतत परतत राहावे. आपल्या वाटणातून तेल बाजूला झाल्यावर आता या मिश्रणात आपली बोय मासळी टाकावी. मासळी मिश्रणात चांगली परतून घ्यावी. आता यात किमान ४ वाटी पाणी टाकावे. त्या पेक्षा जास्त टाकू नये, कारण सर्व मिश्रणाचे प्रमाण आणि पाणी यांची तुलना जास्त झाली तर ग्रेव्ही पात्तळ होईल. त्यामुळे मिश्रणाचे प्रमाण याचा अंदाज घेऊन पाणी टाकावे. आता संपूर्ण मिश्रण एकतजीव करून घ्यावे. आता यात चवीनुसार मीठ टाकावे. आता येथे आंबट पणा येण्यासाठी आपण चिंच, आंबोशी किव्हा कोकम असे काही वापरू शकता. मी कोकम वापरले आहेत. कोकम टाकून झाल्यावर मिश्रणाला ५ मिनिटे चांगली उकळी काढावी. ५ मिनिटे झाल्यावर आपल्या ग्यासची फ्लेम बंद करावी. कोळ्यांचे गरमागरम अस्सल कोळी मसाल्यात बनवलेले बोयरीचे आंबट तयार आहे.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *