• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

प्रॉन्स कोळीवाडा स्टाटर्स

साहित्य – १० ते १२ टायगर प्रॉन्स (कोलंबी), चौकोनी आकारात काप केलेले सुरणाचे तुकडे, चौकोनी आकारात काप केलेले लाल आणि पिवळ्या भोपळी मिरचीचे तुकडे, चौकोनी आकारात काप केलेले कांद्यांचे तुकडे, १२ ते १५ लसुन पाकळ्या, ४ हिरवी मिरची, २ इंच आले, मुठभर कोथिंबीर, हळद, ३ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, २ चमचे कोकम आगळ, एक चमचा लिंबाचा रस, मीठ चवीनुसार, ५ ते ६ बांबू स्कुअर आणि तळण्याकरिता तेल.

कृती – प्रथम लसुन, मिरची, आले, कोथिंबीर यांची पेस्ट तयार करावी. हि पेस्ट १ चमचा सर्व प्रॉन्सवर टाकावी आणि सोबत अर्धा चमचा हळद, २ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, अर्धा चमचा कोकम आगळ, व चवीनुसार मीठ टाकून सर्व मिश्रण चांगले एकजीव करून १५ मिनिटे रूम टेंपरेचर वर ठेवा. आता सुरणाच्या तुकड्यांवर अर्धा चमचा तयार हिरवी पेस्ट टाकावी आणि सोबत अर्धा चमचा हळद, अर्धा चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, अर्धा चमचा कोकम आगळ, व चवीनुसार मीठ टाकून सर्व मिश्रण चांगले एकजीव करून १५ मिनिटे रूम टेंपरेचर वर ठेवा. नंतर काप केलेले लाल आणि पिवळ्या भोपळी मिरचीचे तुकडे, कांद्यांचे तुकडे घ्या त्यावर एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा हिरवी पेस्ट आणि चवीनुसार मीठ टाकून चांगले मिक्स करून हे देखील १५ मिनिटे रूम टेंपरेचर वर ठेवा. १५ मिनिटानंतर एका प्यान मध्ये २ चमचे तेल गरम करून त्यात प्रॉन्स चांगले तळून घ्या. प्रॉन्स तळून झाल्यावर चौकोनी सुरण दोन्ही बाजूने टाळून घ्या. आता लाल आणि पिवळ्या भोपळी मिरचीचे तुकडे, कांद्यांचे तुकडे ६०% पर्यंत तळून घ्या कारण यांना आपण क्रिस्पी ठेवणार आहोत. आता वेळ आहे बांबू स्कुअर मध्ये ओवण्याची. एक बांबू स्कुअर घेऊन त्यात प्रथम हिरवी भोपळी मिरची, नंतर कांदा, लाल भोपळी मिरची, प्रॉन्स, पिवळी भोपळी मिरची, कांदा, लाल भोपळी मिरची, प्रॉन्स असे एका मागोमाग एक स्कुअर मध्ये टाकत जा जेणेकरून तुमचे हे स्टाटर्स अगदी कलरफुल दिसून येईल व खातानाही तितकाच आनंद. अशाच प्रकारे बाकीच्या स्कुअर मध्ये हि सर्व प्रॉन्स आणि इतर सामग्री ओवून प्रॉन्स कोळीवाडा स्टाटर्स एका प्लेट मध्ये सर्व्ह करा.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *