
तर्रीदार कर्ली मासळीचे कालवण
साहित्य – ५ ते ६ कर्ली मासळीचे तुकडे, एक मोठा चमचा आले लसणाची पेस्ट, २ बारीक चिरलेले कांदे, एक वाटी ओल्या नारळाचा खीस, २ हिरव्या मिरच्या, अर्धा कप कोथिंबीर, २ चमचे कोकम आगळ, एक चमचा हळद, ३ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, चवीनुसार मीठ आणि ४ चमचे तेल.
कृती – सर्व प्रथम ओल्या नारळाचा खीस, २ हिरव्या मिरच्या, अर्धा कप कोथिंबीर यांचे वाटण तयार करून घ्या. आता एका पातेल्यात तेल गरम करून त्यात आले लसणाची पेस्ट टाका आणि लालसर करून घ्या. पेस्ट लालसर झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा टाका आणि हा देखील लालसर परतून घ्या. कांदा परतून झाल्यावर त्यात ओल्या नारळाचे वाटण टाका आणि सोबत एक चमचा हळद आणि ३ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला टाकावा आणि संपूर्ण मिश्रण एकजीव करून त्याला तेलात सतत परतत रहा जो पर्यंत मिश्रणातून तेल बाजूला होत नाही. तेल बाजूला झाल्यावर त्यात कर्ली मासळीचे तुकडे सोडावेत. मासळी मसाल्यात चांगली एकजीव करून घ्यावी. आता यात ४ कप पाणी टाकून यात २ चमचे कोकम आगळ आणि चवीनुसार मीठ टाकावे व चांगले घोळून सर्व जिन्नस २० मिनिटे चांगले उकळून घ्यावे. २० मिनिटानंतर वर एक लालसर तर्री आलेली दिसेल म्हणजेच आपले तर्रीदार कर्ली मासळीचे कालवण तयार आहे.
There are no comments