• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

गरमागरम खापरीवरची तांदळाची भाकरी

साहित्य– तांदळाचं पीठ २ १/२ कप, पाणी ३ कप,

कृती – सर्व प्रथम पीठ चाळणीने चालून घ्या. नंतर एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. उकळी आली की त्यात लगेचच पीठ एकाहाताने थोडेथोडे घालत ढवळत रहावे. गॆस बंद करावा. ही झाली उकड तयार. ही उकड गरम असतानाच चांगली मळून घ्यावी. पोळ्यांच्या कणके इतपत मऊसर झाली पाहिजे. उकडीचे ५ इंच व्यासाचे गोळे तयार करुन एका ओल्या फडक्याखाली किंवा टिश्यू पेपर खाली झाकून ठेवावेत. भाकरी शक्यतो लगेचच करायला घ्यावी.

एकीकडे खापरी तापत ठेवावी. ( चूल असल्यास अती उत्तम ) परातीवर एक गोळा घेऊन पोळीसारखा तांदळाच्या पिठावर हाताने थापावा. दोन्ही हाताच्या चारही बोटाने ठसे उमटत भाकरी गोल आकारात मोठी करावी. भाकरी गोल आकाराची झाल्यावर अलगद दोन्ही हातानी उचलून पिठाची म्हणजे वरची बाजू वरच येईल अशा पद्धतीने तव्यावर टाकावी. दोन्ही बाजूने चांगली शेकवून घ्यावी. अशाच प्रकारे बाकीच्या देखील भाकऱ्या कराव्यात आणि गरमागरम मासळीच्या रस्या सोबत किंव्हा मटणासोबत आनंद घ्यावा.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *