• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

कोळीवाड्यातली अस्सल झणझणीत ‘ गावरान कोंबडी ‘

साहित्य – १ किलो गावठी कोंबडी, १ वाटी ( ८० ग्रॅम ) खिसलेलं सुखं खोबरं, ४  tbl spn ओरीजनल सिक्रेट कोळी मसाला, १ tea spn हळद, १ tbl spn खसखस, १ tbl spn तीळ, १ tbl spn तांदूळ, २ tbl spn  आले लसुन आणि मिर्चीचा ठेचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, ४ tbl spn तेल.

कृती – सर्वप्रथम सुखं खोबरं तांबूस रंग येई पर्यंत चांगले भाजून घ्यावे. नंतर खसखस, तीळ, तांदूळ हे देखील लालसर भाजून घ्यावे. हे सर्व मिश्रण एका वाटीत काढून त्याची पेस्ट करून घ्यावी. एका भांड्यात ४ मोठे चमचे तेल तापवून घ्यायचे. तेल तापल्यावर त्यात आले, लसुन आणि मिर्चीचा ठेचा टाकायचा, ठेचा लालसर होईपर्यंत चांगला भाजून घ्यावा. आले लसुन आणि मिर्ची चे मिश्रण चांगले भाजून झाल्यावर त्यात आपली गावठी कोंबडी चे तुकडे सोडावे. कोंबडीचे तुकडे चांगले तेलात किमान ५ मिनिटे परतून घ्यावे. परतून झाल्यावर त्यात १ छोटा चमचा हळद टाकावी. सिक्रेट कोळी मसाला टाकायचा. आपण जर जास्त तिखट पसंत नाही करत असाल तर तिखट कमी जास्त करू शकता. आता सर्व मिश्रण या मसाल्यात चांगले मिक्स करून घ्यावे. सर्व मिश्रण चांगले एकजीव झाल्यावर त्यावर झाकण ठेवून १० मिनिटे वाफेवर शिजवावे. १० मिनिटांनंतर त्यात आपण तयार कलेल्या वाटणाची पेस्ट टाकावी. आता वरून बारीक चिरलेली अर्धी वाटी कोथिंबीर टाकावी आणि यात आपल्या चवीनुसार मीठ टाकायचे. सर्व मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्यावे. नंतर पुन्हा यावर झाकण ठेवून कोंबडीला वाफेवरच चांगले शिजवून घ्यायचे. वाफेवर शिजत असताना मध्ये मध्ये मिश्रण परतून घ्यायचे. नाहीतर आपले मिश्रण खाली लागण्याची शक्यताहि असू शकते. नंतर पुन्हा यावर झाकण ठेवून किमान ४० मिनिटे  वाफेवर शिजवून घ्यायचे.  या रेसीपिला जास्तीतजास्त करून वाफेवर यासाठी शिजवत आहे कारण बॉयलर कोंबडी पेक्षा गावठी कोंबडीला शिजण्यासाठी थोडा जास्थच वेळ लागतो. आणि याचा दुसरा फायदा म्हणजे वाफेवर शिजताना यातील फ़्लेव्हर्स आतल्याआतच राहतील व त्याची वेगळीच खमंग चव आपल्याला चाखायला देखील मिळते. ५ मिनिटांनंतर सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घायचे. आता सर्व मिश्रण २ मिनिटे झाकण उघडे ठेवून एक उकळी काढावी आणि गॅस बंद करावा. कोळीवाड्यातली अस्सल झणझणीत ‘ गावरान कोंबडी ‘ तयार झाली आहे. गावरान कोंबडीचा आस्वाद आपण गरमागरम तांदळाच्या भाकरी सोबत  घेऊ शकता.

2 Comments

  1. Pingback: essayforme
  2. viagra online says:

    Hi there to all, how is everything, I think every one is getting more from this web page, and your views are fastidious for new visitors.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *