• Gavanpada Koliwada, Behind SBI Bank, Nr. Fish Market, Mulund (East) Mumbai - 400081
  • +91-8652718718

आंबट तिखट कर्दी

साहित्य – एक मोठी वाटी कर्दी, ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला, हळद, करवंद, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली मिर्ची, मध्यम चिरलेला टोम्याटो, २ कोकम, क्रश केलेले आले लसुन, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तळण्या करिता तेल

कृती – सर्व प्रथम एका पॅन मध्ये साधारण ४ मोठे चमचे तेल टाकायचे आणि चांगले तापवून घ्यायचे. तेल चांगल्या प्रकारे तापल्यावर त्यात एक वाटी बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा तेलात तांबूस रंग येई पर्यंत परतवायचा. नंतर त्यात क्रश केलेलं आले लसुन आणि बारीक चिरलेली मिर्ची टाकायची. मिर्ची आणि आले लसुन तेलात चांगले खरपूस भाजून घ्यायचे. सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे परतून झाल्यावर त्यात एक छोटा चमचा हळद टाकायची. ३ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला टाकायचा. आता सर्व मिश्रण एकत्रित चांगले मिक्स करून घ्यायचे. सर्व मिश्रण एकत्रित चांगले मिक्स करून झाल्यावर त्यात काप केलेले टोमॅटो सोडायचे. टोमॅटो या सर्व मिश्रणात मिक्स करून घ्यायचे. आता यात किमान अर्धी वाटी ताजी करवंद टाकायची. करवंद या मिश्रणात चांगली मिक्स करून घ्यायची. सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे परतून झाल्यावर त्यात कर्दी टाकायची, २ कोकम आणि सोबत त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. संपूर्ण मिश्रण मसाल्यात चांगले एकजीव करून घ्यावे. कर्दी आणि संपूर्ण मसाले एकजीव झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ टाकायचे. आता यात अर्धी वाटी पाणी टाकून सर्व मिश्रण एकजीव करायचे आणि किमान १० मिनिटे झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घ्यावे. १० मिनिटांनंतर गॅस बंद करून घ्यावा आणि वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर स्प्रिंकल करून घ्यावी. आपली ‘आंबट तिखट कर्दी ‘ तयार झाली आहे. आता सर्व मिश्रण मिक्स करून आपण एका छान सर्विंग बॉउल मध्ये काढून घेऊया.

There are no comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *