Crab Gravy – चिंबोरीचा रस्सा
साहित्य – ५ ते ६ चिंबोरी / खेकडे , एक वाटी भाजलेले सुखे खोबरे , ४ हिरव्या मिरच्या , १० ते १२ लसूण पाकळ्या आणि २ १/२ इंच आल्याचा तुकडा, अर्धी वाटी चिंचेचा कोळ, ३ मोठे कांदे बारीक चिरलेले, एक वाटी कोथिंबीर, १ १/२ चमचा हळद, ४ चमचे ओरिजिनल सिक्रेट कोळी मसाला, चवीनुसार मीठ, चिंबोरीचा अर्क तयार करण्यासाठी त्याच्या नांग्या.
एका पातेल्यात अथवा कढईत १ चमचा तेल टाकून प्रथम बारीक चिरलेला सर्व कांदा टाकावा. सोबत आले आणि लसूण टाकून कांदा तांबूस रंगापर्यंत परतून घ्यावा. आले, लसूण आणि कांदा परतून झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यावेत. आता या मिक्सरच्या भांडयात भाजलेले सुके खोबरे टाकावे, मिरची टाकावी, कोथिंबीर टाकावी. आता या सर्व मिश्रणाचे बारीक वाटण तयार करून घ्यावे. नंतर कढईत ४ चमचे तेल टाकून चांगले तापवून घ्यावे. तेल चांगले तापल्यावर यात तयार वाटण टाकावे. १ १/२ चमचा हळद टाकावी. ४ चमचे ओरिजिनल सिक्रेट कोळी मसाला टाकावा. आता सर्व मिश्रण एकत्रित करून वाटणाला तेल सुटे पर्यंत सतत परतत राहावे. वाटणाला तेल सुटल्यानंतर यात चिंबोऱ्या टाकाव्यात. चिंबोर्या या वाटणामध्ये सर्व बाजूने घोळून घ्याव्यात. चिंबोर्या वाटणामध्ये चांगल्या मुरल्यानंतर यात चिंबोरीच्या नांग्यांचा अर्क टाकायचा. ( चिंबोरीचा अर्क तयार करण्यासाठी चिंबोरीच्या नांग्या आधी ठेचून घ्या. त्यांना मिक्सर मध्ये २ ते ३ वेळा २ वाटी पाणी टाकून फिरवून घ्या आणि एका गाळणीच्या साहाय्याने सर्व अर्क गाळून घ्या ) नंतर यात वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. अर्धी वाटी चिंचेचा कोळ टाकावा. सर्व मिश्रण चांगले मिक्स करून घ्या. आता रस्स्यासाठी यात किमान २ ग्लास पाणी टाकावे. मी येथे माझ्या मिक्सर भांड्यात थोडे वाटण राहिले होते म्हणून त्यात पाणी टाकून त्याचा वापर करीत आहे. आता यात आपल्या चवीनुसार मीठ टाकावे. आता गॅस मध्यम आचेवर ठेवून चिंबोरीच्या रस्याला एक १५ मिनिटे चांगली उकळ काढावी. रस्याला एक मस्त सुगंधित उकळी सुटली कि गॅस बंद करावा आणि चिंबोरीला एका सर्व्हिंग प्लेट मध्ये काढून घ्यावेत. आपला चिंबोरीचा झणझणीत रस्सा तय्यार ! चिंबोरीचा हा रस्सा आपण वाफाळत्या भाता सोबत किंव्हा गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत हुरपू शकता.
Wow …. Very nice ?