सुरमई तवा फ्राय – Surmai Tawa Fry
साहित्य – २ ते ३ सुरमईचे मध्यम तुकडे, २ चमचे कोकम आगळ, २ हिरव्या मिरच्या, ५ ते ६ लसुन पाकळ्या, एक लहान तुकडा आले, कोथिंबीर , १ चमचा हळद, २ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला आणि तळण्यासाठी तेल.
कृती – सुरमईचे तुकडे स्वच्छ करून त्यावर २ चमचे कोकम आगळ, १ चमचा हळद, २ चमचे ओरिजनल सिक्रेट कोळी मसाला टाकायचा. आता २ हिरव्या मिरच्या, ५ ते ६ लसुन पाकळ्या, एक लहान तुकडा आले, कोथिंबीर यांची पेस्ट बनवून हि पेस्ट २ चमचे टाकावी. यात चवीनुसार मीठ टाकावे. सर्व मिश्रण सुरमई च्या तुकड्यांना व्यवस्थित लावून २० मिनिटे मुरण्यासाठी ठेवाव्यात. एका तव्यावर तेल गरम करून सुरमई दोन्ही बाजूने चांगली तांबूस रंग पर्यंत तळून घ्यावी आणि एका सुंदर प्लेट मध्ये काढून सर्व्ह करावी.
Very nice bhau… Khup chan…..
Thanku for the recipe….
Hi
Koli Masala khoop chan aahe
Amhala aavdla
Thanks.