सुक्या बोंबीलचे रसरशीत आंबट – Dry Bombil Curry
साहित्य – १०/१२ सुके बोंबील, २ वांगी मध्यम काप केलेली, अर्धी वाटी कोथिंबीर, ४ चिंचेचा कोळ, २ तांदळाचे पीठ, २ कांदे बारीक काप केलेले, २ बटाटी मध्यम काप केलेली, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, चवीनुसार मीठ, २ tbl spn सिक्रेट कोळी मसाला, १ tea spn हळद.
कृती – सर्वप्रथम एका पातेल्यात ४ चमचे तेल टाकून चांगले तापवून घ्या आणि त्यात कांदे टाकून सोनेरी रंगापर्यंत परतून घ्या. एका बोंबीलचे तीन समान तुकडे करून गरम पाण्यात ३ मिनिटे ठेवावे. ( पाणी उकळते नसावे ) त्याच गरम पाण्यात बोंबील चांगले धुवून घ्यावे. नंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. कांदा परतून झाल्यावर यात आता बारीक चिरलेली मिरची, हळद आणि सिक्रेट कोळी मसाला टाकावा. सर्व मिश्रण आता चांगले परतून घ्यावे. मिश्रण पेरून झाल्यावर यात बोंबील आणि बटाटी टाकावीत. बोंबील आणि बटाटी या मिश्रणात एकजीव करून चांगली परतून घ्यावी आणि रस्स्यासाठी बोंबील बटाटी बुडे पर्यंत साधे पाणी टाकावे. सर्व मिश्रणाला एक चांगली उकळी काढावी. रस्याला चांगली उकळी आल्यावर यात आता वांगी सोडावी. (टीप : वांगी अगोदर शिजविण्या करिता टाकू नये, नाहीतर वांगी अधिक शिजली जातील आणि ती खळून जातील. ) रस्स्यात वांगी टाकल्यानंतर सोबत चिंचेचा कोळ आणि तांदळाचे पीठ टाकावे ( चिंचेचा कोळ आणि तांदळाचे पीठ एकत्र करून चांगले घोळून घ्यावे. गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्यावी. ) चवीनुसार मीठ टाकावे. गॅसची फ्लेम वाढवावी आणि सर्व मिश्रणाला ५ ते १० मिनिटे चांगली उकळी काढावी. उकळी आल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी आणि गरमागरम बोंबील सर्व्ह करावे.
Lay bhari