थंडगार सोलकढी
साहित्य – ५०० ग्रॅम ओल्या नारळाचा खीस, ५ ते ६ tbl spn कोकम आगळ ( (Kokum Concentrate) , ६-७ लसूण पाकळ्या , २ tbl spn भाजलेले जिरे, १/२ इंच आले , २ हिरव्या मिरच्या, १० ते १२ काळीमिरी, १ tbl spn बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ
कृती – सर्व प्रथम एका ब्लेंडर मध्ये किंव्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये ओल्या नारळाचा खिस टाका, भाजलेले जीरे टाका, हिरव्या मिरच्या टाका, लसूण पाकळ्या टाका, काळीमिरी टाका, आले टाका, ग्लास भर पाणी टाकून पात्तळ वाटून घ्यायचे. एक खोलगट भांडे घेऊन त्यावर चाळण ठेवा किंव्हा मलमलच्या कपड्याने गाळून घ्या. चाळणीत उरलेले सर्व मिश्रण पुन्हा मिक्सर मध्ये घेऊन त्यात थोडे पाणी टाकून वाटून घ्या. चाळणीच्या साहाय्याने सर्व मिश्रण गाळून घ्या. पूर्ण रसाळ दूध काढून झाल्यावर पाणी अधिक वाढवू नये. आता या दुधात कोकम आगळ मिक्स करा. (कोकमाचे आगळ म्हणजेच साखरविरहित कोकमाचा घट्ट कोळ) आगळ टाकताना थोडे थोडे करून टाका आणि अंदाज घेऊन दुसरे टाका. कोथिंबीर टाका, आपल्या चवीनुसार मीठ टाका . सर्व मिश्रण चांगले मिक्स करून घ्या, सर्व्हिंग ग्लास मध्ये १ -१ बर्फाचा तुकडा टाकून घ्या. ग्लासमध्ये सोलकढी सर्व्ह करून घ्या. तयार आहे किनाऱ्यावरची आणि प्रत्येक कोळीवाड्यात प्रसिद्ध असलेली थंडगार सोलकढी.
टीप : शरीराला थंडावा देणारी सोलकढी हि पीत्त शामक आहे आणि सोलकढीने आपली पचनक्रिया देखील जलद गतीने होते म्हणून हि खास करून मासळीचा किंव्हा कोणताही मांसाहार केल्यानंतर आवर्जून प्यायली जाते.
Excellent Dadus…!!!
Khup Chan mastch